नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाच्या वतीने ‘रंग दे नागपूर’ या भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेचे (wall painting competition) आयोजन येत्या ११ व १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. चार संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, २ ऑक्टोबर पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी कलावंतानी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येत स्पर्धेत सहभागी घ्यावा असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी केले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या देखरेखीत ‘रंग दे नागपूर’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून मनपाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्याचे दर्शन घडविणे हा उद्देश आहे. विद्यार्थी (१८ वर्षांवरील) आणि व्यावसायिक अशा दोन गटात ह

See Full Page