नागपूर , ता. २०: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा कणा असलेल्या १०९९ आशा स्वयंसेविकांना राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता.१९) दिवाळी भेट म्हणून सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सायकलमुळे कामात गती येईल आणि सेवा करण्याची ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
रविवारी (ता.१९) शहरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण – दुग्ध्व्याव्साय – अपारंपरिक उर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री श्री. अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्री. श्याम कुमार बर्वे, आमदार डॉ. परिणय फुले, आमदार श्री.आशिष देशमुख, आमदार श्री. कृपा